रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक रंगा हरी यांचे निधन

0

कोची- RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक RANGA HARI  रंगा हरी यांचे रविवारी सकाळी केरळमधील कोची येथे वृद्धापकाळाने एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. रंगा हरी यांनी संघाचे अखिल भारतीय बौद्धीक प्रमुख, अखिल भारतीय कार्यकारीणीचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

रंगा हरी यांना तब्बल १० भाषा अवगत होत्या. त्यात मल्याळम, हिंदी, इंग्रजी, तामीळ, संस्कृत, कोकणी, बंगाली, गुजराती, आसामीसह ते मराठीही बोलायचे. विविध भाषांमध्ये त्यांची २५ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
रंगा हरी यांचा जन्म ५ डिसेंबर १९३० रोजी केरळमध्येच झाला. त्यांचे वडील संघाचे स्वयंसेवक होते. विद्यार्थी दशेतच ते संघाच्या संपर्कात आले व संघकार्यात सक्रीय झाले. अर्थशास्त्रात बीए आणि संस्कृतमध्ये एमए चे शिक्षण घेतल्यावर १९५१ मध्ये रंगा हरी संघाचे पूर्णकालीन प्रचारक झाले होते. १९८० मध्ये त्यांच्याकडे केरळ प्रांत बौद्धिक प्रमुख, १९८३ मध्ये केरळ प्रांत प्रचारक म्हणून जबाबदारी आली होती. १९९० मध्ये त्यांच्याकडे अखिल भारतीय सह बौद्धिक प्रमुख आणि १९९१ मध्ये त्यांच्याकडे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख म्हणून जबाबदारी आली. २००५ पर्यंत त्यांची ही जबाबदारी सांभाळली. १९९४ ते २००५ या कालावधीत त्यांनी संघाच्या विदेशातील हिंदु स्वयंसेवक संघाची आशिया आणि ऑस्ट्रेलियातील कार्याची अतिरिक्त जबाबदारीही सांभाळली होती.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा