
कोल्हापूर kolhapur -मराठा आरक्षण संदर्भात राज्य शासन कटिबद्ध असूनमराठा समाजाला न्याय देण्याचे कामं महायुती सरकार करेल.मागच्या सरकारमुळे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकले नाही.आम्ही सुप्रीम कोर्टाच्या त्रुटीवर कामं सुरु केले आहे. सुणावणी घेण्यास कोर्टाने संमती दाखवली आहे. मराठा आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टाने एक खिडकी उघडली आहे अशावेळी आता मराठा समाजाने धैर्य आणि धीर ठेवला पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. मराठा समाजाला कायद्यात टिकणारे आरक्षण महायुती सरकार देईल.युवकांनी आत्महत्यासारखे पाऊल उचलू नये. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण देऊ, दोन दिवसात मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. मराठा समाजाच्या तरुणांना विविध योजनांचा लाभ देण्यास सरकार कटीबद्ध आहे .राज्यसरकार युद्धपातळीवर कामं करत आहे
मनोज जरांगे पाटील यांची काळजी राज्य सरकार ला आहे. मात्र,समंजसपणाची भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. राज्य सरकार सकारात्मक आहे हे त्यांनी समजून घ्यावे, सरकारने स्थापन केलेली समिती मराठा आरक्षणाबाबत योग्य पद्धतीने काम करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
