खबरदारीचा उपाय ,एसटी बंद

0

बीड  BEED – बीड लमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीला हिंसक वळण लागले आहे. काल रात्री दोन बसेस जाळल्यानंतर आज बीडहून कल्याणकडे जाणाऱ्या बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एसटी महामंडळाने सर्व एसटी सेवा बंद ठेवलीआहे. पुढील आदेश येईपर्यंत या बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी बस स्थानक परिसरामध्ये प्रवासी खोळंबले आहेत. महामंडळाने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे आता प्रवासी ताटकळले आहेत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा