चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांची संख्या 18 लक्ष 2 हजार 811 वर

0

 

चंद्रपूर 29 ऑक्टोबर   CHNDRAPUR  – 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर जिल्ह्यामध्ये विधानसभा मतदारसंघानुसार एकूण 9 लक्ष 25 हजार 150 पुरुष मतदार, 8 लक्ष 77 हजार 609 स्त्री मतदार, तर 52 तृतीयपंथी असे एकूण 18 लक्ष 2 हजार 811 मतदार असल्याचीबमहिती समोर आली आहे.The number of voters in Chandrapur district is 18 lakh 2 thousand 811 

जिल्ह्यातील मतदारांची संख्या 18 लक्ष 2 हजार 811 असून जिल्ह्यात एकूण 9979 दिव्यांग व्यक्तिंची नोंदणी असून यापैकी मतदार म्हणून 5227 दिव्यांगांची नोंदणी झाली आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या पुनरिक्षण पूर्व उपक्रमानुसार जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाची कार्यवाही करण्यात आली आहे. सहा विधानसभा मतदारसंघातील सुसूत्रीकरणापूर्वी मतदान केंद्राची संख्या 2023 होती. मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये बदल करण्यात आलेल्या मतदान केंद्राची संख्या 54 आहे. 137 मतदान केंद्राच्या नावामध्ये बदल करण्यात आला आहे तर विलीन करण्यात आलेल्या मतदान केंद्राची संख्या 2 आहे. प्रस्तावित नवीन मतदान केंद्राची संख्या 11 असून एकूण 211 मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. सुसूत्रीकरणानंतर होणारी मतदान केंद्राची संख्या ही 2032 झाली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा