grampanchayat election बारामतीवर अजित पवार गटाचे वर्चस्व

0

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत NCP फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत बारामतीवर  AJIT PAWAR  अजित पवार यांनी आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. बारामती तालुक्यात एकूण ३२ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली असून ३२ पैकी २२ ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाने झेंडा फडकवला आहे. दुसरीकडे Sharad Pawar शरद पवार गटाला मोठाच धक्का बसला.

भाजपसोबत सत्ता स्थापन करणाऱ्या अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तालुक्यातील भोंडवेवाडी, म्हसोबानगर पवई माळ, आंबी बुद्रुक, पानसरे वाडी, गाडीखेल, जराडवाडी, करंजे, कुतवळवाडी दंडवाडी, मगरवाडी, निंबोडी, साबळेवाडी, उंडवडी कप, काळखैरेवाडी, चौधरवाडी, वंजारवाडी, चांदगुडेवाडी या गावात अजित पवारांचा गट विजयी झाला आहे. मागील काही वर्षांपासून बारामती तालुक्यात सातत्याने राष्ट्रवादीचा विजय होत आला आहे. यंदाही अजित पवार यांनी वर्चस्व कायम राखले. बारामती तालुक्यात भाजपचा पहिला सरपंच विजयी झाला आहे. बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी येथे भाजपचा सरपंच विजयी झाला आहे. बारामतीत आत्तापर्यंत 23 गावांचा निकाल हाती त्यापैकी 22 राष्ट्रवादीकडे तर एका गावात भाजपचा सरपंच निवडून आला आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या रांजणगाव ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाचे वर्चस्व आहे. 13 जागांसह सरपंच पदावरदेखील अजित पवार गटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. शिरुरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. केवळ 3 जागांवरतीच शरद पवार गटाला समाधान मानावे लागले आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा