मराठा आरक्षणाच्या मुद्यावर छगन भुजबळ पुन्हा आक्रमक

0

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणावरून पुन्हा राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal on Maratha Reservation) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे येत असताना त्यांचे अंतरवाली सराटी फाट्यावर समर्थकांकडून भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी बोलतांना भुजबळ यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला असून १७ नोव्हेंबरला अंबड येथे ओबीसींच्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
भुजबळांनी जामखेड फाटा येथे स्वागत स्वीकारताना ओबीसींना मोर्चे आणि आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. दहशत माजवून जे मिळेल ते पदरात पाडून घेण्याचे ते म्हणाले. १७ नोव्हेंबर रोजी अंबड येथे ओबीसींच्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून कोणत्याही आमंत्रणाची वाट न पाहता मोठ्या संख्येने एकत्रित येण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्यावर अन्याय होत असेल आणि दुःख झालं असेल तर आपल्याला कोणीही डॉक्टर औषध देणार नाही. त्यामुळे आपल्याला दहशत माजवावी लागेल. समोरच्या दरवाज्यातून एन्ट्री मिळत नाही, म्हणून तुम्ही मागच्या दरवाजाने येण्याचा हा प्रकार आहे. सर्व ओबीसींना एकत्रित येऊन उपोषण मोर्चे काढून एक आवाजात उभे राहावे लागेल. नाहीतर आपल्या लेकरा बाळांचे भवितव्य धोक्यात येईल, असे भुजबळ म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा