ग्राम पंचायत निकाल, राज्यात भाजप आघाडीवर

0

(Mumbai)मुंबई : राज्यातील तब्बल २३५९ ग्राम पंचायतींच्या निकालात सध्याचा कल पाहता भाजप आघाडीवर असून महायुती पहिल्या क्रमांकावर आहे. (Maharashtra Gram Panchayat Election Result) आतापर्यंत आलेल्या निकालानुसार भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर (Ajit Pawar)अजित पवार गट असून त्या खालोखाल काँग्रेस, (Sharad Pawar group of NCP)राष्ट्रवादीचा शरद पवार गट, ठाकरे गटाची कामगिरी आहे.

ग्रामपंचायतींमधील वर्चस्वाच्या निवडणुकीत आतापर्यंत लागलेल्या निकालामध्ये महायुती आघाडीवर आहे. भाजपला २७८, शिंदे गट १३०, अजित पवार गट २०१, काँग्रेस ७१, शरद पवार गट ६६ , ठाकरे गट ५७ आणि इतरांना समावेश आहे. विदर्भातील निकालांवर भाजपचा वरचष्मा राहिलेला आहे.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा