दिवाळीनिमित्त कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळावा

0

 

नागपूर  NAGPUR – कारागृहातील कैद्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यामार्फत निर्मित वस्तूंना बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने नागपूरच्या मध्यवर्ती कारागृह येथील महाराष्ट्र कारागृह उद्योग विक्री केंद्रामार्फत दिवाळी सणानिमित्त प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा सत्र न्यायाधीश एस बी अग्रवाल यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. कारागृहातील कैदी हा समाजाचा एक घटक असतो, त्यामुळे निश्चितच त्यांच्यात विविध प्रकारचे उपजत कलागुण असतात.

त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने सुधारणा व पुनर्वसन हे ब्रीद असलेल्या कारागृह विभागाकडून कैद्यांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिल्या जाते. कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र कारागृह उद्योग विक्री केंद्राची स्थापना करण्यात आली असून त्यामार्फत बंदीवाण निर्मित वस्तूंची विक्री करण्यात येते. दिवाळी सणांचे औचित्य साधून प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात कैद्यांनी सागवान लाकडापासून तयार केलेले विविध प्रकारचे फर्निचर, शोभेच्या वस्तू, आकाशकंदील, कपडे, बेडशीट, चादरी आदी जीवनोपयोगी वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन रोज सकाळी 9 ते 8 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती मध्यवर्ती कारागृह, उपअधीक्षक दीपा आगे यांनी दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा