
नागपूर NAGPUR – नागपूर पोलिसांनी शहरात मोठा घातपात रोखण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. अलीकडेच झालेल्या हत्येच्या तपासात मोमीनपुरा येथून ९ बंदूक ८४ काडतुस जप्त करण्यात तहसील पोलिसांना यश आले आहे.
फिरोज खान आणि इम्रान आलम अशी अटकेतील आरोपीची नावे आहेत. मोमीनपुरा येथे गेस्ट हाऊस मालक जमील अहमदची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याच प्रकरणात तपास सुरू असताना तहसील पोलिसांच्या हाती हे बंदूक आणि काडतुस सापडले आहेत.
हत्येप्रकरणी मोहम्मद परवेज आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. मारेकरी मोहम्मद परवेजने हत्येच्या गुन्ह्यात वापरलेली बंदूक ही फिरोज खानला दिली होती. अशी माहिती हत्येच्या तपासात उघड झाली. त्यानंतर फिरोजच्या घरात धाड टाकून पोलिसांनी ८ पिस्टल, १ देशी कट्टा, ८४ कडतुस जप्त केली. फिरोज खानला बंदूक देणारा हा इमरान आलम मध्यप्रदेशच्या बालाघाटचा रहिवासी आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरूध्द गुन्हा नोंदवून अटक केली आहे.पोलिस उपायुक्त गोरख भांबरे यांनी हो माहिती दिली.
