मुंबईच्या पु. ल. महोत्सवात नागपूरच्या अरुंधती देशमुख

0

 

महाराष्ट्र शासनाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे मुंबईत आयोजित वार्षिक पु. ल. कला महोत्सवात यंदा प्रसिद्ध रवीन्द्र संगीत गायिका (Arundhati Deshmukh)अरुंधती देशमुख यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
शुक्रवार, 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता प्रभादेवीतील अकादमीच्या रवीन्द्र नाट्य मंदिर परिसरात कलांगणच्या खुल्या रंगमंचावर “शोंगीत शिल्पी पी. एल. बाबू” (पु. ल. आणि बंगाल यांचा साहित्य-संगीतमय भावबंध) हा कार्यक्रम होईल. यात पु. लं. च्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.

या कार्यक्रमात अरुंधती देशमुख यांच्यासह ठाण्याच्या प्रसिद्ध बाऊल गायिका (Dr. Uttara Chausalkar)डॉ. उत्तरा चौसाळकर आणि पुण्याचे ज्येष्ठ पत्रकार हेमकांत नावडीकर यांचाही सहभाग आहे. धनश्री लेले सूत्रसंचालन करतील.
यावर्षीचा पु. ल. कला महोत्सव 8 ते 14 नोव्हेंबर असा ऐन दिवाळीत आठवडाभर चालेल. महोत्सवाचे हे तेरावे वर्ष आहे.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा