कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

0

 

बुलडाणा – कोरोनासारख्या महामारीच्या काळात जर कुणी साथ दिली असेल तर ती आरोग्य यंत्रणेने दिली. सख्खे नातेवाईक व कुणीही रुग्णाच्याजवळ जायला तयार नव्हते, त्यावेळी हेच राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणारे कर्मचारी सेवा देत होते. परंतु राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने अद्यापही पूर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी संघटना समायेजन कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

मागील 15 वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर खेडोपाडी व शहरात राष्ट्रीय अभियान अंतर्गत कंत्राटी आरोग्य सेविका, सहाय्यीका प्रयोग शाळा तंत्रज्ञ, औषधी निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी इत्यादी संवर्गात कंत्राटी कर्मचारी आपल्या जिवाची राखरांगोळी करत आरोग्य सेवा देत आहेत. मागण्यांची पुर्तता झाली नसल्याने संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा