चार मंत्र्यांचे शिष्टमंडळ आज जरांगेंना भेटणार

0

जालना : मराठा आरक्षण प्रकरणी पुढील चर्चेसाठी चार मंत्र्यांचे शिष्टमंडळ आज मनोज जरागे यांना भेटणार आहे. सरकारने यासाठी चार मंत्र्यांची नावेही निश्चित केली आहेत. आज संध्याकाळपर्यंत चार मंत्र्यांचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
जरांगे यांच्या भेटीला सरकारचे शिष्टमंडळ जाणार आहे. ज्या चार मंत्र्यांचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे, त्यात उदय सामंत, शंभूराजे देसाई, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे यांचा समावेश आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्यावर संभाजीनगरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, सोमवारी एक शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला येणार असल्याची माहिती खुद्द जरांगे यांनी दिली होती. मात्र, काही कारणास्तव शिष्टमंडळाचा हा दौरा रद्द झाला. त्यानंतर ७ नोव्हेंबरला म्हणजेच मंगळवारी हे शिष्टमंडळ येत असल्याची माहिती जरांगे यांना मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली होती. परंतु, मुख्यमंत्री शिंदे श्रीनगरच्या दौऱ्यावर गेल्याने शिष्टमंडळाचा दौरा पुन्हा रद्द झाला होता. आता आजच हे शिष्टमंडळ जाणार आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा