उत्कृष्ट चिकित्सक गौरव पुरस्कार

0

स्वामी समर्थ हॉस्पिटलचे संचालक श्री. डॉ. प्रदिप पाटील यांनी त्यांचे हॉस्पिटलमध्ये हृदयासंबंधीचे उपचार रुग्णांवर करित आहेत प्रामुख्याने हृदयावरील उपचारामध्ये अॅन्जिओप्लास्टी, बायपास या सारखे उपचार करण्यात येतात. ही तर एक महागडी उपचारपद्धत आहे तसेच रुग्णाच्या भवितव्याबद्दल ही सांशकता असते.

 

परंतु डॉ प्रदिप पाटील हे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बिना चिरफाड न करता किसे कमी खर्चाची उपचार ईईसीपी मशिनद्वारे देतात. त्यामुळे रुग्णांना मानसिक समाधान लाभते. व रुग्ण पूर्णपणे बरा होऊन आनंददायी व निर्भय जिवन जगत आहेत. ही सेवा गेल्या २० वर्षापासून देत आहेत. त्यांच्या योगदानाची दखल नागपुर मेडिकल असोसिएशने दरवर्षी घेवून डॉक्टर असोसिएशन नागपूर व डॉ. सुभाष वाघे यांचे यांच्या हेल्थ फॉउंडेशन मार्फत दि 5/11/2023 रोजी अमृत भवन येथे Best Physician Award डॉ प्रदिप पाटील यांना डॉ सुभाष वाघे व डॉ. नितिन वर्गणे यांचे उपस्थितीत डॉ. उदय बोधनकर यांचे हस्ते प्रदान करण्यात येवून त्यांचे कामांचा गौरव करण्यात आला.

 

तसेच शाल व श्रीफल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावद्ध डॉ. प्रदिप पाटील यांनी डॉ. सुभाष वाघ व डॉ. नितिन वर्गणे यांचे आभार मानले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा