ओबीसी समाजातील सर्व ४०० जातींचा शोध घ्या- बबनराव तायवाडे

0

 

नागपूर – मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांचे आरोप निराधार आहेत.कोणताही ओबीसी नेता वाद पेटवत नाही.मराठा आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही. मुळात ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देता कामा नये ही आमची भूमिका आजही कायम आहे. कुणबी जातीचा शोध घेण्याऐवजी ओबीसी समाजातील सर्व 400 जातींचा शोध घेण्याची मागणी ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे  Babanrao Taiwade यांनी केली आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी संदर्भात व्यक्त केलेल्या मताचे समर्थन केले.
तायवाडे म्हणाले, शासनाने बोलावले तेव्हाच आम्ही सर्व भूमिका स्पष्ट केली.मी सरकारला विनंती केली होती, नुसत्या कुणबी जातीचा शोध न घेता ओबीसी समाजातील सर्व ४०० जातींचा शोध घ्यावा, सरकारने असे करुन ओबीसी समाजाला न्याय द्यावा
सरसकट कुणबी प्रमाणपत्र सरकार देऊ शकत नाही, मागासवर्गीय आयोगाला एखादी जात समाविष्ट करावी किंवा बाहेर काढावी हा अधिकार आहे. मात्र,ज्या जातींचा आधीच ओबीसीमध्ये समावेश आहे, त्या जातीचा अभ्यास करण्याचा अधिकार मागासवर्गीय आयोगाला आहे का? नवीन जात ॲड करण्याचा अधिकार आहे का? याचे उत्तर सरकारला आणि राज्य मागासवर्गीय आयोगाला समाजाला द्याव लागणार आहे. नितीश कुमार यांनी बिहारमध्ये दिलेल्या आरक्षण संदर्भात जातनिहाय जनगणना करण्यात यावी ही ओबीसी समाजाची संपूर्ण देशात मागणी आहे. सर्वात पहिले एक पाऊल पुढे टाकण्याचे काम बिहारचे मुख्यमंत्री नितेश कुमार यांनी केले. बिहारमध्ये एसटी ओबीसी मिळून संख्या 75 टक्के जात असल्याने त्यांना 65 टक्के आरक्षण देण्यासाठी सुधारणा ते करत आहेत असेही बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा