“२४ डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा..”: मनोज जरांगे

0

संभाजीनगर-राज्य सरकारने २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावे, अन्यथा आरक्षण विरोधी नेत्यांची नावे जाहीर करु, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. ओबीसी समाजाला आरक्षणामध्ये ज्या काही सुविधा आहेत, त्या सर्व सुविधा मराठा आरक्षण देताना आम्हाला मिळाल्या पाहिजे, असे जरांगे म्हणाले Manoj Jarange आहेत. ओबीसींना शिक्षण आणि नोकऱ्यासह मिळणार राजकीय आरक्षण सुद्धा मराठा समाजाला मिळाले पाहिजे, असे जरांगे यांनी म्हटले आहे.

मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण देतांना फक्त शिक्षण आणि नोकरीतच आरक्षण दिले पाहिजे, अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे. मात्र, ओबीसी समाजाला आरक्षणामध्ये ज्या काही सुविधा आहेत, त्या सर्व सुविधा मराठा आरक्षण देताना आम्हाला मिळाल्या पाहिजे, असे जरांगे यांनी म्हटले आहे. ओबीसींना शिक्षण आणि नोकऱ्यासह मिळणारे राजकीय आरक्षण सुद्धा मराठा समाजाला मिळाले पाहिजे, असे अप्रत्यक्षपणे जरांगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे यावरून आता ओबीसी समाज आणखीनच आक्रमक होण्याची शक्यता आहे.
सरकारकडून जोमात काम सुरु आहे. प्रमाणपत्र हातात पडेल त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात काम सुरु आहे. सरकारकडून दिरंगाई होत नाही. माझी तब्येत देखील ठणठणीत असून, पुन्हा जोमाने कामाला लागणार आहे. मराठा समाजाच्या नोंदी आहेत, त्यामुळे त्यांना ओबीसीत आरक्षण मिळाले पाहिजे अशी ओबीसी समाजाची भूमिका आहे. पुरावे असून देखील 40 वर्ष मराठ्यांचे वाटोळे झाले. ओबीसी नेत्यांच्या दबावामुळे आम्हाला न्याय मिळाला नाही. पण आता सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही, तर कोणामुळे आरक्षण मिळालं नाही त्यांची नावं समोर आणणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा