
पंढरपूर PANDHARPUR – मराठा समाजाने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत गोंधळ घातला. कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेस कुठल्याही उपमुख्यमंत्र्यास बोलवू नये अशी मराठा समाजाची मागणी होती. मंदिर समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यासंदर्भात आज चर्चा होणार होती.मराठा समाजाच्या गोंधळामुळे मंदिर समितीच्या बैठकीचे कामकाज बंद पडले. सामान्य वारकऱ्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करावी, पंढरपुरात शासकीय कार्यक्रमांना आमदार खासदार व मंत्र्यांच्या कार्यक्रमांना विरोध कायम राहणार ससल्याची सकल मराठा समाजाची भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आल्याची माहिती रामभाऊ गायकवाड, मराठा क्रांती मोर्चा यांनी दिली.