महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, नितीशकुमारांची दिलगिरी

0

पाटणा-बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार  Nitish Kumar  यांनी महिलांबाबत केलेल्या अत्यंक्ष आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल बुधवारी सकाळी माफी मागितली. विधान केल्यानंतर 16 तासांनी त्यांनी विधानसभेबाहेर आणि सभागृहात हात जोडून अनेकदा खेद व्यक्त केला. माझ्या वक्तव्यामुळे कोणाचे मन दुखावले असेल तर मी माफी मागतो. लोकसंख्या नियंत्रणासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षणानंतर लोकसंख्येच्या वाढीमध्ये होणारे बदल सांगणे एवढेच माझे उद्दिष्ट होते, असे त्यांनी सांगितले. (Bihar CM Nitish Kumar Statement on Women)
नितीशकुमार म्हणाले की, माझ्या विधानावर कोणी टीका करत असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. यानंतरही माझ्यावर कोणी टीका केली तर मी त्याचे अभिनंदन करतो.
या वक्तव्यावर भाजपने नितीशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बिहार विधानसभेतही बुधवारी या वक्तव्याचे संतप्त पडसाद उमटले. मंगळवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंगळवारी मांडण्यात आलेल्या जात-आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालावरील चर्चेनंतरच्या उत्तरात मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. महिला शिक्षित असतील तर खात्रीशीर प्रजनन दर कमी होईल, असे सांगताना नितीशकुमार यांनी पती-पत्नीमधील नाते आणि प्रजनन प्रक्रियेचाही उल्लेख केला. सुशिक्षित पत्नी गर्भधारणेची शक्यता टाळते व त्यामुळे जन्मदर घटला आहे, असे सांगण्याच्या प्रयत्नात नितीशकुमार यांनी महिलांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा