मनोज जरांगेंकडून महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा

0

जालना-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली. १५ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत ते महाराष्ट्राचा दौरा करणार असून यात मराठा समाज बांधवांशी संवाद साधणार आहे, अशी त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहे. (Maratha Reservation Issue)
मराठा समाजाशी पुन्हा एकदा संवाद साधण्याची गरज आहे. त्यामुळे हा महाराष्ट्र दौरा करत आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 15 नोव्हेंबर पासून 23 पर्यंत सहा टप्प्यात दौरा होणार आहे. एक डिसेंबर समाजाचे महाराष्ट्रातील प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू राहील. दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात देशाला आरक्षण देणाऱ्या शाहू महाराजांच्या स्मारकपासून सुरुवात होणार आहे .तर शेवट शेवगावमध्ये होणार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या पुढच्या टप्प्यातील दौऱ्याचीही घोषणा केली आहे. विदर्भ, उर्वरित मराठवाडा, कोकण असा पुढचा महाराष्ट्र दौऱ्याचा टप्पा असेल, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा