
अकोला- अकोल्यातील शास्त्री स्टेडियमजवळील भंगार बाजाराला आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये अंदाजे 7 ते 8 भंगार दुकाने आगीत जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत अग्निशमन दलाचे 4 बंब लागले असून, या आगीने भंगार व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अद्यापही आग आटोक्यात आली नसून युद्ध पातळीवर अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा