आर्थिक वर्षात आतापर्यंत 12.37 लाख कोटी रुपये एकूण प्रत्यक्ष कर संकलन

0

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर  : आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 9 नोव्हेंबर 2023 पर्यंतच्या प्रत्यक्ष कर संकलनाची तात्पुरती आकडेवारी स्थिर वाढ नोंदवत आहे. एकूण प्रत्यक्ष कर संकलन. 12.37 लाख कोटी रुपये इतके झाले, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील एकूण संकलनापेक्षा 17.59% जास्त आहे. परताव्याच्या स्वरुपात झालेले निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन,10.60 लाख कोटी रुपये इतके आहे आणि ते गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा 21.82% जास्त आहे.2023-24 या आर्थिक वर्षात हे संकलन प्रत्यक्ष करांच्या एकूण अंदाजपत्रकाच्या 58.15% आहे.

एकूण महसूल संकलनाच्या दृष्टीने कॉर्पोरेट आयकर (सीआयटी) आणि वैयक्तिक आयकर (पीआयटी) यांच्या वाढीचा दराचा विचार केल्यास, सीआयटीसाठी वाढीचा दर 7.13% आहे, तर पीआयटीसाठी 28.29% (केवळ वैयक्तिक आयकर) आणि पीआयटीसह सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT)] 27.98. % इतका आहे. परताव्याच्या समायोजनानंतर, सीआयटी संकलनातील निव्वळ वाढ 12.48% आहे आणि पीआयटी संकलनातील वाढ 31.77% (केवळ PIT) तसेच 31.26% (सेवा आयकरासह वैयक्तिक आयकर) आहे.

1 एप्रिल 2023 ते 09 नोव्हेंबर 2023 या कालावधीत 1.77 लाख कोटी रुपये इतकी परताव्याची रक्कम जारी करण्यात आली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा