ग्रा. पं. निवडणुकीतून ‘खऱ्या’ राष्ट्रवादीवर शिक्कामोर्तब-तटकरे

0

मुंबई MUMBAI -राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांमधून खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या माध्यमातून राज्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारले असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा दावा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलाय.
राष्ट्रवादी पक्षातील फुटीवर निवडणूक आयोगात आज युक्तिवाद होणार आहे. त्यापूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना तटकरे म्हणाले की या प्रकरणात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निवडणूक आयोग जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेन, असेही तटकरे म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा