भारतात केवळ हिंदु संस्कृतीमुळेच लोकशाही टिकली-जावेद अख्तर

0

मुंबई : भारतात लोकशाही टिकली असेल तर ती हिंदू संस्कृतीमुळेच असे सांगताना श्रीराम आणि सीता या फक्त हिंदू देवता आणि देवी नाहीत तर हा भारताचा सांस्कृतिक वारसा आहे. मी नास्तिक असलो तरी राम आणि सीता यांना आजही या देशाची संपत्ती मानतो. रामायण हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. मला अभिमान आहे की मी राम आणि सीतेच्या भूमीवर जन्मलो, असे मत सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केले आहे. मनसेच्या वतीने दिवाळी निमित्त आयोजित कार्यक्रमात जावेद अख्तर बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत सलीम खानही मंचावर उपस्थित होते. दोन्ही लेखक बऱ्याच काळानंतर एकाच मंचावर दिसले.

जावेद अख्तर म्हणााले की, भारतात लोकशाही टिकली असेल तर ती हिंदू संस्कृतीमुळेच. आपण बरोबर आहोत आणि इतर चुकीचे आहोत असा विचार करणे हा हिंदू संस्कृतीचा भाग नाही. आता असहिष्णुता वाढत असली तरी हिंदू संस्कृती सहिष्णू असल्याने देशात लोकशाहीही अबाधित आहे. (Javed Akhtar on Hindu Culture) पूर्वी काही लोक असहिष्णू होते. हिंदू तसे नव्हते. हिंदूंचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची विचारसरणी व्यापक होती. ही खासियत हरवली तर तेही इतर लोकांसारखे होतील. ते होऊ नये. आम्ही तुमच्याकडून जगायला शिकलो, पण हिंदू ती मूल्ये सोडतील का? त्यांनी हे करू नये, असे जावेद अख्तर म्हणाले.

सध्या भारत सोडला तर भूमध्य समुद्रापर्यंत लोकशाही व्यवस्था असलेला दुसरा देश नाही. मूर्तीची पूजा करणारा सुद्धा हिंदू आहे, जो करत नाही तो सुद्धा हिंदू आहे आणि जर कोणी एकच देव मानत असेल तर तो सुद्धा हिंदू आहे, कोणी कोणाची पूजा करत नसला तरी तो हिंदूच आहे. ही हिंदू संस्कृतीच आपल्याला लोकशाही मूल्ये देते. त्यामुळे या देशात लोकशाही जिवंत आहे, असे ते म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा