मराठा समन्वयक शिष्टमंडळाने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

0

 

जालना- 30 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर आहेत. बीड पोलिसांनी आतापर्यंत तब्बल साडेचार हजार जणांची चौकशी केली असून चौकशीत पाचशेहून अधिक आरोपी आहेत. या प्रकरणात मराठा समन्वयकांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेऊन विनंती पत्र दिले आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विविध पथके स्थापन केली. या पथकांनी आतापर्यंत 171 आरोपींना अटक केली आहे. पोलीस निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप मराठा समन्वयकांच्या शिष्टमंडळाने केला. पोलिसांनी देखील आम्ही निरपराध तरुणांवर कारवाई करत नाहीत असे स्पष्टीकरण दिले आहे. यातील मास्टरमाईड लवकरच सापडेल त्यासाठी दोन पथके मागावर असल्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा