“आता मराठीचा प्रश्न कुणी कुणाला विचारायचा?”..भाजपचा राज ठाकरेंना टोला!

0

मुंबई MUMBAI – मनसेच्या दीपोत्सवाचे यंदा प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आणि सलीम खान यांच्या हस्ते उद्घाटन झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे  Ashish Shelar by MNS President Raj Thackeray यांना टोला लगावला आहे. आम्हीही एखाद्या कार्यक्रमाला सलीम खान आणि जावेद अख्तर यांना बोलवू, पण तो कार्यक्रम दीपावलीचा नसेल, असा टोला आशिष शेलारांनी राज ठाकरेंना लगावला आहे. आता मराठीचा प्रश्न कुणी कुणाला विचारायचा?” असा सवालही शेलारांनी उपस्थित केला आहे.
शेलार म्हणाले, दीपोत्सवाचे आयोजन कुठल्याही पक्षाने करावे. ते स्वागतार्ह आहे. कलाकाराला जात, धर्म, भाषा नसते. पण, गुरूवारी सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या उपस्थितीत एक उद्घाटन झाले. आम्ही गायिका उत्तरा केळकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन करतोय. दीपोत्सव करणाऱ्यांनी सलीम खान आणि जावेद अख्तर यांना घेऊन टिमकी वाजवून घेतली. पण, आमचे मराठी कलाकार छोटे नाहीत. मराठी कलाकारांच्या उपस्थितीत दीपोत्सव झाला पाहिजे, ही भाजपाची संकल्पना आहे. आम्हीही एखाद्या कार्यक्रमाला सलीम खान आणि जावेद अख्तर यांना बोलवू. पण, तो कार्यक्रम दिपावलीचा नसेल, असेही आशिष शेलारांनी म्हटले आहे. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे. “तिसरे अजून घराबाहेर पडले नाहीत. हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणून आयुष्य़भर राजकारण करणाऱ्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी काँग्रेसचा हात पकडला, अशी टीकाही त्यांनी केली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा