
नागपूर NAGPUR : भाजपचे BJP नागपूर ग्रामीणचे नेते राजू डेंगरे यांचा खून करण्यात आला. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून त्यांच्या ढाब्यावरील कर्मचाऱ्यांनीच खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. यामागे राजकीय वैमनस्य आहे की काय, याचाही शोध पोलिसांकडून सुरु आहे. विहिरगाव परिसरात राजू डेंगरे यांचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री तीन वाजता ही घटनाा घडली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांची हॉस्पिटलमध्ये गर्दी झाली आहे. लोकप्रतिनिधी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. या हत्येमुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. राजू डेंगरे हे ग्रामपंचायत निवणुकीतले विजयी उमेदवार होते. या प्रकरणी कुही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.