रमेश चोपडे विद्यापीठ सल्लागार परिषदेवर

0

नागपूर -राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सल्लागार परिषदेच्या सदस्य पदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश चोपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश चोपडे यांची नियुक्ती सामाजिक कार्यकर्ता म्हणून करण्यात आली असून राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. राज्यपालांच्या सचिवाकडून त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा