आम्ही पक्षाशी बेईमानी केली नाही, याचा आनंद- संजय राऊत

0

 

मुंबई MUMBAI  – माझी मागची दिवाळी इकडे नव्हती. मात्र,आम्ही पक्षाशी बेईमानी केली नाही. याचा आम्हाला आनंद होता, हीच आमची दिवाळी.
आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक राहिलो असे प्रतिपादन सेना नेते खा संजय राऊत यांनी केले. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंब्य्रात जाणार आहोत. छातीवर पाय देऊन समाचार घेऊ. राज्यात मोगलाई सुरू आहे. आता बुलडोझर फिरवत आहेत, बाळासाहेब ठाकरे त्यांना मंदिर मानत होते. उद्धव ठाकरे यांना मुंब्य्रात येण्यापासून पोलीस रोखत आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात येत आहे. त्यांना तडीपार करण्याची धमकी देत आहेत. पोलिसांसमोर बॅनर फाडत आहेत. जे आता आम्हाला अडवत होते, त्यावेळी शाखा तोडताना पोलीस कुठे होते? जे पोलीस शिंदे सरकारची चाकरी करत आहेत, त्यांना एवढंच सांगत आहे की, 31 नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसणार. पोलीस आयुक्तांना आव्हान करतो, आम्ही येत आहोत. तुम्ही आम्हाला अडवून दाखवा.जेव्हा शाखा तोडली जात होती, तेव्हा पोलीस झोपले होते का? आता पोलीस सक्रिय झाले आहेत. मी वारंवार सांगतोय की, एकनाथ शिंदे जास्त दिवस मुख्यमंत्री राहणार नाहीत. पुढे मुख्यमंत्री कोण असेल? हे माहिती नसेल. पण सरकार बदलेल असा दावा राऊत यांनी केला.
आजारी असताना अजित पवार दिल्लीला गेले, हसण्यासारखं आहे. आपल्याकडे तब्येत ठीक नसेल आपण त्यांना जाऊन भेटतो. एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट सत्तेतून जाणार आहे यावर भर दिला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा