
अहमदनगर : दिपावली उत्सवाच्या औचित्यावर आंध्रप्रदेश येथील देणगीदार साईभक्त एम. श्रीनिवास राव यांनी मेडिकल फंडासाठी १२ लाख रुपये देणगीचा डी.डी. संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी शाल, श्रींची मूर्ती व श्री साईसतचरित्र देत त्यांचा सत्कार केला.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा