नागपुरात फटाक्यांचे सर्वाधिक प्रदूषण महाल परिसरात

0

नागपूर NAGPUR – दिवाळीत DIWALI  मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. यावर्षीही वातावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले असून त्याचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर झाला आहे. ग्रीन प्लॅनेटचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे  Suresh Chopane यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. LAKSHMIPUJAN लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री ९ वाजता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतलेल्या प्रदूषणाच्या आढाव्यात  MAHARASHTA महाराष्ट्रात सर्वाधिक हवा उपवन ठाणे येथे येथे आढळून आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तेथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३६३० इतका जास्त आढळून आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही हवेच्या गुणवत्तेची अत्यंत धोकादायक पातळी मानली जाते.

साधारणतः हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३०० पेक्षा अधिक राहिल्यास आरोग्याच्या दृष्टीने ती अत्यंत घातक समजली जाते. त्यानंतर अकोला येथील एक्यूआय २०७०, नगर येथील एक्यूआय १९५१, पुणे येथील एक्यूआय १७४१, नागपुरातील महाल परिसरातील एक्यूआय १२५६, जळगाव-१०८५ आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये चंद्रपुर-455, अमरावती-684, परभणी-698, जालना-442, लातुर-534, कोल्हापूर-618, सांगली-465, नाशिक-728, धुळे-486, संभाजीनगर-388, सोलापूर-312 अशी एक्यूआयची स्थिती आढळून आली.

नागपुरात..

उपराजधानी नागपुरात महाल परिसरात हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक एक्यूआय -1256 ते 1535, रामनगर परिसरात 566-1109, अंबाझरी परिसरात-302-645, सिव्हिल लाईन्स परिसरात 300 च्या आसपास आढळून आला. याचाच अर्थ नागपुरात महाल परिसरात फटाक्यांमध्ये झालेल्या प्रदूषणाचे प्रमाणात शहरात सर्वाधिक होते, असे त्यांनी नमूद केले आहे.

घातक प्रदूषण

फटाक्यांमुळे पर्यावरण आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतात.फटाक्यात वापरात येणारी धातू निर्माण होणारा आवाज आणि रसायने उदा.सल्फर, झिंक,कॉपर, सोडियम इ हे आरोग्यासाठी धोकादायक असून त्यामुळे श्वसनाचे रोग,त्वचा रोग,ह्रदय रोग,मानसिक रोग उद्भवतात, असे चोपणे यांनी सांगितले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा