हा आहे फटाक्यांचा परिणाम!

0

NAGPUR दरवर्षी दिवाळीच्या आनंदाच्या उत्सवात फटाक्यांमुळे अत्यंत प्रदूषण होत असून त्याचे आरोग्यासाठी गंभीर परिणाम सोसावे लागत आहे.ह्यावर्षी सुद्धा महाराष्ट्रा तील हवा गुणवत्ता फटाक्यांमुळे अत्यंत खराब झाली असून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रात्री केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दर ताशी घेण्यात येणाऱ्या रात्री 9.00 वा घेतलेल्या निरीक्षना नुसार महाराष्ट्रात सर्वाधिक हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ●उपवन ठाणे येथे 3630●अकोला-2070●थेरगाव,पुणे येथे-1741● महाल,नागपूर -1256●,जळगाव-1085,●अहमदनगर-1951 आढळला.

महाराष्ट्रातील इतर शहरात निर्देशांक

●चंद्रपुर-455 ●अमरावती-684
●परभणी-698● ●जालना-442
●लातुर-534 ●कोल्हापूर-618
●सांगली-465 ●नाशिक-728
●धुळे-486 ●औरंगाबाद-388
● सोलापूर-312

फटाक्यांमुळे पर्यावरण आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतात.फटाक्यात वापरात येणारी धातू निर्माण होणारा आवाज आणि रसायने उदा.सल्फर, झिंक,कॉपर, सोडियम इ हे आरोग्यासाठी धोकादायक असून त्यामुळे श्वसनाचे रोग,त्वचा रोग,ह्रदय रोग,मानसिक रोग उद्भवतात.
प्रा सुरेश चोपणे
पर्यावरण अभ्यासक
अध्यक्ष-
ग्रीन प्लानेट सोसायटी

 

नागपूर येथील निर्देशांक

काल रात्री 9 ते 10 वाजेदरम्यान नागपूर येथे आढळलेला दरतासी वायू गुणवत्ता निर्देशांक
महाल -1256 ते 1535
रामनगर-566
अंबाझरी-302
सोव्हिल लाईन्स-300

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा