विजय वडेट्टीवारांना धमक्या, सुरक्षा वाढविण्याची मागणी

0

नागपूर NAGPUR : आपल्याला फोनवर धमकीचे संदेश आले असून आपली सुरक्षा वाढविण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यांना फोनवर संदेशाच्या स्वरुपात धमक्यात येत असल्याची माहिती असून यासंदर्भात त्यांनी अधिकृतपणे बोलण्यास नकार दिलाय. (Leader of Opposition Vijay Waddettiwar)
एका वाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे. वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सुरक्षा वाढविण्याची मागणी केल्याचे मान्य केले आहे. मात्र, त्यामागील कारण स्पष्ट केलेले नाही. धमक्या देणारे नेमके कोण आहेत, हे देखील त्यांनी स्पष्ट केलेले नाही. मात्र, अलिकडेच मराठा आंदोलकांशी वाद सुरु झाल्यानंतरच या धमक्या आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
दरम्यान, अजितदादांना आता भाजपच्या तिकीटावर लढावे लागणार, या शब्दात वडेट्टीवार यांनी निशाणा साधला. दिल्लीचे चरणदास झालेले आता आपली दादागिरी दाखवूच शकणार नाहीत. रडण्याची स्थिती आता अजित पवारांवर आली असेल भाजप सोबत आलेल्यांना रडवून रडवून सडवतात. त्यामुळं आता रडण्याची आणि सडण्याची वेळ अजित पवारांवर आली असावी, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली. अजित पवारांना भाजपच्याच तिकीटावर लढावे लागेल, असे मला एकूण दिसत आहे. त्यांना कमळावर लढल्याशिवाय पर्याय नाही हे मी ठामपणे सांगतो, असेही ते म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा