तुपकरांनी शेतात सोयाबीन – कापूस पूजन करून केली दिवाळी साजरी

0

 

बुलढाणा BULDHANA – निसर्गाची अवकृपा आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरण यामुळे शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारात आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या कुटुंबासह व शेतकरी बांधवांसोबत रात्रीच्या अंधारात शेतात सोयाबीन आणि कापूस पूजन करून अनोखी दिवाळी साजरी केली. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची सध्या सोयाबीन-उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘एल्गार रथयात्रा’ सुरू आहे. 5 नोव्हेंबर पासून संतनगरी शेगाव येथील संत गजाननाचे दर्शन घेऊन ही यात्रा सुरू झाली आहे. ही यात्रा गावोगावी फिरून बैठका, सभा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. दररोज वेगवेगळ्या तालुक्यात मुक्काम होत आहे. दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजनाला घरी न जाता आपल्या कुटुंबीयांसह शेतकऱ्याच्या शेतात अंधारात सोयाबीन व कापसाचे पूजन करून अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. शेतातील सोयाबीन कापूस हीच शेतकऱ्यांची लक्ष्मी आहे. परंतु सोयाबीन-कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा