प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता

0

नवी दिल्ली: प्रदूषणामुळे यावर्षीही राजधानी नवी दिल्लीची चर्चा सुरु असताना भारतातील दिल्ली, मुंबई आणि कोलकाता ही मेट्रो शहरे दिवाळीनंतर जगातील १० सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत समाविष्ट झाली आहेत. ( most polluted cities in the world) नवी दिल्लीतील हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. याशिवाय महाराष्ट्रातील मुंबईतील प्रदूषणाची चर्चाही सुरु आहे. अशातच जागतिक स्तरावरील प्रदूषित शहरांमध्ये राजधानी दिल्ली पहिल्या क्रमांकावर असल्याचे अहवाल प्रकाशित झाले आहेत.
एका स्विस गटाच्या वतीने अभ्यासात आढळून आले की, दिल्लीसह कोलकाता आणि मुंबई ही जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. सोमवारी दिल्लीने जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून अव्वल स्थान मिळवले. तर कोलकाता चौथ्या क्रमांकावर आणि मुंबई नवव्या स्थानावर आहे. नवी दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट असून दिल्लीचा एअर क्विलिटी इंडेक्स ४०७ इतका नोंदविण्यात आलाय

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा