
अमरावती AMRAWATI – सध्या वातावरणामध्ये होणारा बदल व ढगाळ वातावरणामुळे अमरावती जिल्ह्यात तूर पिकावर अळीचे संकट ओढवले आहे. सध्या TUR तूर पीक फुलोर अवस्थेवर तर काही ठिकाणी शेंगा अवस्थेत असताना आता या पिकांवर शेंगा पोकळण्याऱ्या अळीचे संकट आल्यामुळे आता पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असताना मोठ्या प्रमाणात शेतकरी फवारणी करताना दिसून येत आहे, यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगले उत्पादन झाले नसल्याने संपूर्ण शेतकरी आता तूर पिकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे उत्पादन वाढीसाठी शेतकरी तूर पिकांकडे अधिक भर देताना दिसून येत आहेत
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा