
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा १५ वा हफ्ता उद्या १५ नोव्हेंबर रोजी जमा होणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडून माहिती देण्यात आली आहे. हा हप्ता उद्याच संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होणार आहे.
पीएम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांना चार महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आत्तापर्यंत या योजनेचे 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. उद्या केंद्र सरकार १५ वा हप्ता जारी करणार आहे. किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (eKYC) करणे बंधनकारक आहे. जर शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पार पाडली नसेल तर अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.