लवकरच काँग्रेसमध्ये मोठे पक्षप्रवेश-पटोले

0

मुंबई- महाराष्ट्रात येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षात मोठे प्रवेश होणार असून त्यासाठी राहुल गांधींचा वेळ घेणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. काँग्रेस पक्षात नेमके कोण प्रवेश करणार आहेत, हे सांगण्यात पटोले यांनी नकार दिला. तुम्हाला लवकरच हे कळेल, असे त्यांनी सांगितले. (MPCC Chief Nana Patole)
पटोले म्हणाले की, राज्यात अनेक मोठ्या समस्या आहेत. राज्य सुसाईड केंद्र झाले आहे का असा प्रश्न पडतो. राज्यातून मोठे उद्योग गुजरातमध्ये जात आहेत. ही परिस्थिती भयावह आहे. राज्यात कोरडा दुष्काळ पडला आहे. ओल्या दुष्काळाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत. शेतकरी अडचणीत असून शिवाजी महाराजांच्या राज्यात सगळ उलट होत आहे. सगळे लुटून सुरतला दिले जात असल्याचे पटोले यांनी सांगितले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा