एलॉन मस्क यांनी मागितली भारतीय मंत्र्याची माफी

0

नवी दिल्ली : टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क यांना केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची माफी मागावी लागली. (World’s Richest Man) मस्क यांनी ही माफी जाहीरपणे मागितली आहे. त्यामागील कारणही तसेच विशेष आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी कॅलिफॉर्नियातील टेस्लाच्या उत्पादन युनिटला भेट दिली. या भेटीच्या वेळी एलॉन मस्क यांना काही कारणाने उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे त्यांनी ट्विट करुन माफी मागितली.
टेस्ला कंपनीचे लवकरच भारतात पदार्पण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील अनेक वर्षांपासून टेस्लाच्या भारतातील आगमनाबाबत उत्सूकता आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा