शमीचा झंझावात, भारत फायनलमध्ये!

0

‘शमी’ वादळानं किवींना लोळवलं, भारत फायनलमध्ये

मुंबई-वर्ल्ड कपच्या सेमिफायनलमध्ये ३९७ धावांचा डोंगर उभारणाऱ्या भारताला न्यूझीलंडन चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर घोंगावणाऱ्या मोहम्मद शमी नावाच्या वादळाने किंवींना पार लोळवलं आणि भारताचा फायनलमधील प्रवेश सुनिश्चित केला. सामना न्यूझीलंडच्या बाजुने झुकेल की काय, अशी स्थिती असताना शमीने न्यूझीलंडच्या सात फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. या विजयानंतर आता १९ नोव्हेंबर रोजी भारताची फायनल उद्याच्या सेमिफायनलमधील विजेत्याशी होणार आहे. उद्याच ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका फायनलसाठी झुंजणार आहेत.

भारताने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली. कोहलीच्या दमदार ११७ आणि श्रेयस अय्यरच्या १०५ धावांच्या भरवश्यावर भारताने न्यूझीलंडपुढे ३९८ धावांचे आव्हान उभे केले. यात कोहलीने एकदिवसीय सामन्यांमधील आपले ५० वे शतक पूर्ण करुन मास्टर ब्लास्टर सचिनचा ४९ शतकांचा रेकार्ड मोडला. न्यूझीलंडची सुरुवात चांगली राहिली नाही. कर्णधार केन विलियमन्सन आणि डॅरील मिचेल या जोडीने भारतीय गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवले होते. दोघांच्या दिडशेहून अधिकच्या भागिदारीने सामना न्यूझीलंडच्या दिशेने झुकेल की काय अशी स्थिती होती. मात्र, सामीने या दोघांनाही एकापाठोपाठ तंबूत पाठवून टीम इंडियाला मोठा दिलासा दिला. त्यानंतर सामीने न्यूझीलंडच्या फलंदाजांना टिकूनच दिले नाही आणि भारताला ७० धावांनी विजय मिळवून दिला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा