थोड्याच वेळात रंगणार सेमिफायनलचा थरार!

0

मुंबई-वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात (India Vs New Zealand Semi Final) आज भारताचा मुकाबला न्यूझीलंडशी होणार आहे. यापूर्वीचा इतिहास विसरुन न्यूझीलंडनवर मात करण्याचे आणि फायनल गाठण्याचे आव्हान टीम इंडियापुढे आहे. अखेरच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये फारसा बदल होण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे. नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार असल्याचेही बोलले जात आहे. (World Cup Cricket-2023)
वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजीला पोषक मानली जाते. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकणारा संघ वानखेडेवर पहिल्यांदा फलंदाजी घेणे पसंत करतो. आतापर्यंत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघालाच जास्त फायदा झालाय. मात्र, काही तज्ज्ञांच्या मते सेमीफायनलसाठी वानखेडेची खेळपट्टी बदलण्यात आल्याने वानखेडेची खेळपट्टी संथ असेल. खेळपट्टीवरील गवत काढण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे खेळपट्टी संथ राहील, असे मानले जात आहे. काही वर्षांत टीम इंडियाने घरच्या मैदानावर संथ खेळपट्टीवर चांगली कामगिरी केली आहे.
सुरक्षेचे आव्हान
मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये दुपारी २ वाजता हा सामना सुरू होईल. पण तत्पूर्वी, मुंबई पोलिसांना एका ट्विटद्वारे वानखेडे मैदान पेटवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे वानखेडे स्टेडिअम परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तपासात धमकीचे ट्विट फसवे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतरही पोलिस धमकी देणाऱ्याचा कसून शोध घेत आहेत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा