
Jammu Bus Accident Center aid Rs 2 lakh families deceased
* पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील डोडा येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी मधून प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले; “जम्मू आणि काश्मीरमधील डोडा येथे झालेला बस अपघात दुःखदायक आहे. ज्या कुटुंबांनी आपले जवळचे नातेवाईक आणि प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासोबत माझ्या संवेदना. या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो.
प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी मधून (PMNRF) प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल.”