खासदार सांस्कृतिक महोत्सव 24 नोव्हेंबरपासून

0

नागपूर- मागील 7 वर्षांपासून नागपुरात सुरु असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे यंदाचे आठवे पर्व आहे. यावेळी प्रथमच सकाळी आणि सायंकाळी 6.30 वाजता अशा दोन सत्रात खासदार सांस्कृतिक महोत्सव होणार असून यंदा प्रेक्षकांना ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी मोबाईल नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे. दरवर्षी प्रमाणे क्रीडा चौक स्थित ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या मैदानात हे आयोजन केले जाणार आहे. प्रेक्षकांना त्यांच्या आवडीचा कार्यक्रम 9158880522 या नंबर वर मिस कॉल करून पासेस मिळवत बघता येणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी लोकांची प्रचंड गर्दी बघता आयोजन स्थळाच्या बाहेर देखील मोठ्या टीव्ही स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली आहे. उदघाटन कार्यक्रमादरम्यान संस्कार भारतीच्या वतीने 900 कलाकारांचा भव्य कार्यक्रम प्रस्तुत केला जाणार आहे. यासोबतच भव्य हनुमान चालीसा होणार आहे. सायंकाळी श्रेया घोषाल यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आहे. भोजपुरी कलाकार अक्षरा सिंग यांचा लाईव्ह कॉन्सर्ट हे एक आकर्षण असणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित क्रांती नायक नावाचे नाट्य देखील सादर होणार आहे. यांनातर प्रसिध्द गायक अदनान सामी यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे.संत गजानन महाराज यांच्यावर आधारित ‘गण गण गणात बोते’ नाट्य सादर होणार आहे . बॉलीवूड सिंगर पियुष मेश्राम यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार असून भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संविधान शिल्पकार नावाचे नाटक देखील सादर केले जाणार आहे. या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप पंजाबी गायक मिका सिंग यांच्या लाईव्ह कॉन्सर्टने होणार आहे. सर्व स्तरातील आणि सर्व समुदायाच्या कलाकारांना मंच देण्याच्या उद्देशातून हे आयोजन केले जात असल्यावर गडकरी यांनी भर दिला. यावेळी खा कृपाल तुमाने, दत्ता मेघे, सत्यनारायण नुवाल, डॉ विकास महात्मे, डॉ विजय डांगरे, प्रा अनिल सोले, बंटी कुकडे, राजेश बागडी आदी आयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा