टीम इंडियाच जिंकणार वानखेडेवर दाखल चाहत्यांना विश्वास

0

 

मुंबई – सलग 9 सामने जिंकून उपांत्य फेरीत पोहचलेला भारत आता 10 वा सामना जिंकून इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. आज वानखेडेवर होणारा सामना पाहण्यासाठी देश-विदेशातून क्रिकेटप्रेमी लोक आले आहेत. न्यूझीलंडकडून आपली टीम आमचा यापुर्वीचा बदला घेईल, भारतच जिंकेल असा चाहत्यांना विश्वास आहे. रोहित शर्माने काल सांगितले होते की, हे माझे घरचे मैदान आहे. ते होम ग्राउंड असल्याने भारत थोडा मजबूत मानला जात आहे. श्रीलंका, न्यूझीलंडला कमी लेखू नये, ते बलाढ्य संघ आहेत पण यावेळी फक्त भारतच जिंकणार असल्याचा चाहत्यांचा दावा आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा