
(Buldhana)बुलढाणा– सकल धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लोकशाही मार्गाने विविध आंदोलन केली जात आहेत.मात्र अजूनही मागणी मंजूर झालेली नाही. सरकारने 50 दिवसाचा वेळ घेऊन 50 दिवसात धनगर समाजाला आरक्षण संदर्भात मार्ग काढतो असे आश्वासन दिले होते.काल 50 दिवस पूर्ण होत झाले असून आजपर्यंत धनगर आरक्षण संदर्भात सरकारकडून कोणत्याही हालचाली झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आज मेहकर तालुक्यातील सोनाटी येथील (Gajanan Borkar)गजानन बोरकर हे धनगर समाज आरक्षणासाठी टॉवरवर चढून आंदोलन करीत आहेत.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा