हिरेंची अटक राजकीय दबावतंत्र-संजय राऊत

0

 

(Mumbai)मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना काल झालेली अटक (Advaya Hire Arrest) पूर्णपणे राजकीय दबावतंत्राचा भाग असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार (Sanjay Raut)संजय राऊत यांनी केला आहे. राऊत म्हणाले, ते जेव्हा भाजपमध्ये होते, तेव्हा त्यांच्यावर आरोप झाला होता. मात्र, आता ते शिवसेनेत आले म्हणून मंत्री दादा भुसे यांनी हे कारस्थान रचले आहे.

अद्वय हिरे आणि त्यांचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील प्रमुख नेेते भाऊसाहेब हिरे त्यांचे आजोबा आहेत. अशी फार मोठी परंपरा हिरे यांना लाभली आहे. पण अद्वय हिरे यांना अटक झाली ती पूर्णपणे राजकीय दबावतंत्राचा भाग आहे. दादा भुसेंवर शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप आहे.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा