“बच्चन सर, फायनल बघू नका..”, चाहत्यांचा महानायकाला सल्ला

0

 

(Mumbai)मुंबई : वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या सेमिफायनलमध्ये भारतानं न्यूझीलंडचा धुव्वा उडविला आणि दिमाखात फायनलमध्य प्रवेश केला. आता साऱ्या देशात फायनलची उत्सूकता असताना महानायक (Amitabh Bachchan)अमिताभ बच्चन यांना चाहत्यांनी फायनलचा सामना न बघण्याचा सल्ला दिला आहे. त्यामागील कारणही मजेदार आहे.

काल सेमिफायनल जिंकल्यावर बच्चन यांनी ट्विट करुन “मी जेव्हा सामना पाहत नाही तेव्हा आपण जिंकतो!” अशी माहिती चाहत्यांना दिली. त्यांच्या या ट्विटवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. असंख्य चाहत्यांनी बच्चन यांना रविवारचा क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना न बघण्याचा सल्ला दिलाय. हा सल्ला देताना चाहत्यांनी गमतीदार उपायही सुचविले आहेत. ट्विटरवर एका चाहत्याने त्यांना ‘सर फायनल मॅच पाहू नका’ असा सल्ला दिलाय. तर दुसऱ्याने ‘बच्चन सर, घरातच राहा’ असा सल्ला दिला. एकाने तर कहरच केला. त्याने ‘वर्ल्ड कप फायनलच्या दिवशी अमिताभ यांना एका दुर्गम बेटावर लॉक करण्याची काहीतरी व्यवस्था करूया’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यापूर्वीही अभिषेक बच्चन याने एका कार्यक्रमात आम्ही त्यांना क्रिकेट सामना बघू देत नाही, असा गौप्यस्फोट केला आहे.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा