“भाजपला ‘फ्रि हीट’, आमची ‘हिट विकेट’ काढतात”, उद्धव ठाकरेंची टीका

0

 

(Mumbai)मुंबई– (Shiv Sena leader Uddhav Thackeray)शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मध्य प्रदेशच्या प्रचार सभेतील भाषणावर तीव्र आक्षेप घेताना भाजपा फक्त सत्तेवर असल्यामुळे त्यांना फ्री हिट द्यायची आणि आम्ही काही केले तर आमची हिट विकेट काढायची, असे निवडणूक आयोगाचे धोरण असल्याची टीका त्यांनी केली आहे. याला मुक्त वातावरणातल्या निवडणुका म्हणता येणार नाही, असेही ते म्हणाले. (Uddhav Thackeray on Election Commission)

उद्धव ठाकरे म्हणाले की, क्रिकेटमध्ये काही नियम असतात तसेच निवडणुकीत आचारसंहिता असते. शिवसेनेच्या वतीने आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. काही शंकांवर खुलासा होण्याची गरज आहे. निवडणूक आयोगाचे धोरण अनेकदा असे दिसते आहे की भाजपा फक्त सत्तेवर असल्यामुळे त्यांना फ्री हिट द्यायची आणि आम्ही काही केले तर आमची हिट विकेट काढायची. याला मुक्त वातावरणातल्या निवडणुका म्हणता येणार नाही. १९८७ साली पार्ल्यात पोटनिवडणूक झाली होती. आमच्याकडून रमेश प्रभू जिंकले होते. भाजपा आमच्या विरोधात होती. ही पहिली निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढलीच नाही तर जिंकली गेली. तेव्हा शिवसेनाप्रमुखांचाही मतदानाचा अधिकार ६ वर्षांसाठी काढून घेण्यात आला. कारण हिंदुत्वाचा प्रचार केला. आज मात्र आम्हाला वाटतंय की निवडणूक आयोगाने आचारसंहितेत बदल केले असावेत. ते केले असतील तर सगळ्यांना ते सारखेच असायला पाहिजेत. ते सगळ्यांना कळले पाहिजेत, असे ठाकरे म्हणाले.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा