“मोहम्मद शमीला अटक करु नका..”, दिल्ली पोलिसांचं ट्विट!

0

(Mumbai)मुंबई : सेमिफायनलमध्ये किंवींचे कंबरडे मोडणारा भारताचा घातक गोलंदाज मोहम्मद शामीच्या कामगिरीचे सर्वच स्तरावर कौतूक होत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या एका ट्विटने क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. “मुंबई पोलीस, आम्ही आशा करतो की, आज झालेल्या हल्ल्यासाठी तुम्ही (Mohammed Shami)मोहम्मद शामीला अटक करणार नाही,” या दिल्ली पोलिसांच्या मजेदार ट्विटला मुंबई पोलिसांनीही त्याच पद्धतीनं उत्तर दिलंय. “दिल्ली पोलीस, तुम्ही असंख्य लोकांची मनं चोरण्याचं कलम लावायला विसरलात आणि तुम्ही सहआरोपींची यादीही दिली नाही..”, असं उत्तर मुंबई पोलिसांनी त्यावर दिलंय. हे उत्तर देताना मुंबई पोलिसांनी त्यावर नागरिकांना आवाहन करणारे भाष्यही केले आहे. दोन्ही विभागांना भारतीय दंड विधानातील तरतुदींची संपूर्ण कल्पना असून आमचा तुमच्या विनोदबुद्धीवर पूर्ण विश्वास असल्याचं मुंबई पोलिसांनी नमूद केले आहे. (World Cup Semi Final)

कालच्या सेमिफायनमध्ये मोहम्मद शमीनं भारतासाठी मोक्याच्या क्षणी भेदक गोलंदाजी करुन केवळ ५७ धावांमध्ये न्यूझीलंडच्या सात फलंदाजांना स्टेडिअमचा रस्ता दाखविला व भारताचा फायनलमधील प्रवेश सुनिश्चित केला.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा