मनोज जरांगेंचा बोलविता धनी लवकरच कळेल?-राज ठाकरे

0

 

(Mumbai)मुंबई : अशा प्रकारे कोणतेच आरक्षण मिळणार नाही, हे आपण मनोज जरांगे यांना भेटून सांगितले होते. (Maratha Reservation) मुळात त्यांच्या मागे कोण आहेत व त्यांना कोण बोलायला सांगत आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे जातीय तणाव का निर्माण होत आहेत, हे लवकरच समोर येईल, असे वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. (MNS Raj Thackeray) या निमित्ताने ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा तोप डागली. (Raj Thackeray On Manoj Jarange) जात ही गोष्ट अनेकांना प्रिय असते. स्वतःच्या जातीबद्दल अभिमान असू शकतो. पण, दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणे हे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात सुरु झाले. यांच्या स्वार्थापायी आपण महाराष्ट्र खड्ड्यात घालतो आहोत. माझ्यासाठी माणूस महत्वाचा आहे व मी जातपात मानत नाही, असे सांगत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला.

हवा आणि ध्वनिप्रदूषणावर न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर राज ठाकरे यांनी टीका केली. आता फटाके कधी वाजवायचे, सण कसे साजरे करायचे, हे पण न्यायालय ठरविणार का, असा सवालही त्यांनी केला. मराठी पाट्यांसंदर्भात आम्ही मुद्दा घेतला, तेव्हा व्यापारी न्यायालयात गेले. सरकारमधून काहीच हालचाली होत नाही. कदाचित आम्हालाच हात पाय हलवावे लागतील, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा