ओबीसी आरक्षणाच्या टक्केवारीबद्दल गैरसमज – हरीभाऊ राठोड

0

 

(Yawatmal)यवतमाळ-ओबीसीचे आरक्षण १४ टक्केवरून एकदम 30 टक्के वर कसे आले आणि १४ टक्के कसे, याबद्दल लोकांच्या मनात ओबीसी आरक्षणाबाबत संभ्रम आहे.महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना राज्यामध्ये मंडल आयोग लागू करायचा होता. राज्यात २७ टक्के आरक्षण लागू करायचे होते. दरम्यानच्या काळात मंडल आयोगाने महाराष्ट्रात दौरा केला. त्यावेळेस मराठा समाजाच्या वतीने कोणीच पुढे आले नाही. उलट आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही,असा सूर मराठा बांधवांमधून येत होता. आज ही सत्य परिस्थिती कोणीच नाकारू शकत नाही. यामुळेच ओबीसी आरक्षणाच्या आकडेवारीबद्दल जो गैरसमज आहे तो चुकीचा आहे असे (Haribhau Rathod)हरीभाऊ राठोड म्हणाले.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा