
(Amravti)अमरावती- संपूर्ण राज्यात आरोग्य कंत्राटी कर्मचारी समायोजन करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. अमरावतीत आजचा आंदोलनाचा 23 वा दिवस आहे. अमरावतीत देखील आरोग्य कंत्राटी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनाला बसले आहेत. यावेळी त्यांनी आज आंदोलनस्थळी जोरदार थाळीनाद करत सरकारचे लक्ष वेधले. कंत्राटी पदावर असलेल्या आरोग्य सेवकांना शासकीय सेवेत समायोजन करा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा